पंडिता रमाबाई - लेख सूची

इतर

आम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. …

तेहतीस कोटी देव आणि एक असहाय अबला

हिंदू कायदा स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती धरत नाही, नवर्या.ची मालकी मानतो. इंग्रजी सरकार सामाजिक रूढीत हात घालायचा नाही म्हणून स्वस्थ बसते. ही तटस्थता जिथे लाभाचा प्रश्न येतो तेव्हा का दाखवत नाही? पारंपारिक हिंदूपेक्षा हे सरकार जास्त जुलमी आहे. कारण एका बाजूला ते स्त्रीला शिक्षण व स्वातंत्र्य घ्यायला सांगते आणि रखमाबाईसारखी एखादी सुशिक्षित स्त्री नकोशा नवर्याषची गुलामगिरी …

आम्ही स्वतंत्र आहों

आम्ही स्वतंत्र आहों हल्ली स्त्रियांची स्थिती पाहिली तर त्यांच्यांत कित्येक दुर्गुण शिरले आहेत. त्या सासुरवासांत असल्यामुळे खोटे बोलण्याची त्यांस संवय लागते व मग ती संवय मुलांस लागते. अशा रीतीने देशांतील लोक सत्य, तेज व साहसहीन होतात. आपण सर्वांनी सत्याचे व्रत धरले पाहिजे व तें आमरण चालविले पाहिजे. कोणास वाटेल की, आम्ही स्त्रियांनी काय सुधारणा करावी. …